
नवी दिल्ली – श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील पट्टीचा फिरकी गोलंदाज रंगना हेरथने बांग्लादेश विरोधात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक इतिहास रचला असून हेरथने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रम यांच्या सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
हेरथने ही ऐतिहासिक कामगिरी शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये बांग्लादेशच्या
तैजुल इस्लामला झेलबाद करत केली. श्रीलंकेच्या संघाने हेरथच्या या विक्रमी
कामगिरीसोबतच बांग्लादेशचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २१५ धावांनी पराभव
केला. हेरथ कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक गडी बाद
करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला असून, आतापर्यंत त्याने
एकून ४१५ गडी बाद केले आहेत. तर वसिम अक्रम यांच्या नावे ४१४ गडी बाद
करण्याचा विक्रम होता. हेरथने ही उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर सोशल
मीडियावर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याला शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment