विवो त्यांचा नवा स्मार्टफोन व्ही ९ २३ मार्चला भार


विवो त्यांचा नवा स्मार्टफोन व्ही ९ २३ मार्चला भारतात लाँच करणार असून त्यापूर्वी भारतीय ई कॉमर्स पोर्टलवर हा फोन लिस्ट झाला आहे. त्यात वेबसाईटवर या फोनची किंमत १ कोटी रुपये दाखविली गेली आहे. ब्लॅक पर्ल आणि गोल्ड कलरमध्ये हा फोन उपलब्ध होत आहे.
या फोनमध्ये एआय आणि एआर अह्हारीत फीचर्स दिली गेली आहेत. एआय फेस ब्युटी, जेंडर डिटेक्शन, एआर स्टीकर्स असलेला हा फोन ड्युअल सीम आहे. अँड्राईड ८.१ ओरिओ फनटच ओएस ४.० वर तो रन होतो. फोनला ६.३ इंची फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. व्हर्टिकल डूअल रिअर कॅमेरा सेटअप असून एलईडी सह १६ एमपीचा प्रायमरी व ५ एमपीचा सेकंडरी कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा २४ एमपीचा आहे.
Share on Google Plus

About Admin Team

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment