
असे अनेक प्रसिद्ध कलाकार बॉलिवूड क्षेत्रात आहेत जे आजच्या तरुणाईला फार आवडतात. या तरुणाईच्या मनाला त्यांचे राहणीमान त्यांची लाईफस्टाईल हे सर्वच भावून जाते. काही कलाकारांचा चित्रपटामधील अभिनय किंवा त्यांचा पोशाख याचे अनेकांना अनुकरण करावेसे वाटते. पण तुम्हाला माहीत नसेल की, बॉलिवूडचे काही कलाकार भारतीय नाहीत.

अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान ही ब्रिटिश नागरिक असून आलियाला देखील ब्रिटिश नागरिकत्व प्राप्त आहे. तिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट सुद्धा आहे. आलियाने खूप सारे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा देखील भारतीय नाही आहे. अमृतसरमध्ये त्याचा जन्म झाला असून दिल्लीत त्याचे पालनपोषण झाले आहे. तसेच कॅनडियन पासपोर्ट अक्षयजवळ असून त्याने कॅनडियन नागरिकत्व स्वीकारले आहे.

बॉलीवूडची चिकनी चमेली म्हणजेच कतरिना कैफचे वडिल काश्मिरी असून तिची आई ब्रिटीश आहे. हाँगकाँगमध्ये तिचा जन्म झाला. लंडन येथे तिचे कुटूंब स्थायिक झाले. मॉडेलिंग करिअरनंतर २००३ साली ‘बूम’ या चित्रपटात ती झळकली.

त्याचबरोबर बॉलीवूडची पद्मावती म्हणजेच दीपिका पादुकोण देखील भारतीय नागरिक नाही. डॅनिश दीपिकाकडे पासपोर्ट आहे. डेन्मार्कमध्ये तिचा जन्म झाला. तसेच जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकन नागरिक असून बहरीन येथे तिचा जन्म झाला आहे.

अभिनेता आमिर खानचा भाचा म्हणजेच इमरान खान हा भारतीय नसून अमेरिकन नागरिक आहे. अमेरिकेतील मॅडसिन, विस्कजिन येथे इमरानचा जन्म झाला. त्याचा २००८ साली प्रदर्शित झालेला ‘जाने तू या जाने ना’ हा पहिला चित्रपट आहे.

‘खामेशियाँ’ या चित्रपटातून गुरमित चौधरी आणि अलि फझलसोबत अभिनेत्री सपना पाबीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २० डिसेंबर १९९२ साली लंडनमध्ये सपनाचा जन्म झाला आहे. त्यानंतर तिने भारतीय नागरिकत्व स्वीकारले. पंजाबी वडिल आणि जर्मन आईने मॉडेल एवलीन शर्माला जन्म दिला आहे. जर्मनी येथे तिचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर तिने बॉलिवूड क्षेत्रात ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातून पदार्पण केले.
0 comments:
Post a Comment